बुलडाणा : भाजपच्या सोशल मिडीया या सेलमध्ये मोठ्या प्रमाणावर मेहनती आणि अभ्यासू तरूणांचा समावेश आहे. बुलडाण्यात या सेलचे सह संयोजक म्हणून दिपक पुराणे काम पाहत होते. तसेच भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस यांना नवीन नियुक्त झालेल्या कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी सुद्धा वैयक्तीक कारणास्तव आपला राजीनामा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.
दिपक पुराणे यांनी राजीनाम्यात वैयक्तीक कारण टाकले असले तरी ते सोशल मिडीया सेलच्या काही पदाधिकार्यांपासून दुखावल्याचे बोलले जाते. निकटवर्तीयाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमाणिकपणे जबाबदारी सांभाळूनही दिपक पुराणे यांना वरच्या श्रेणीत स्थान देण्यात आले नाही. तसेच नवीन कार्यकारिणी दुय्यमस्थान दिल्याने विश्वनाथ माळी यांनी आमच्या प्रतीनिधि शी बोलताना सागितले . त्यांच्याकडे नमामी गंगे अभियान जिल्हाध्यक्षपद आहे. परंतु या अभियानाची कार्यकारिणीची मुदत संपली आहे. भाजपा प्राथमिक सदस्याचा त्यांनी राजीनामा अद्याप दिला नाही. असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. या दोन्ही पदाधिकार्यांनी राजीनामा भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. आकाश फुंडकर यांच्याकडे पाठविला आहे.
