वर्षाअखेर वेगळा विदर्भ मिळवूच : वामनराव चटप
*२७ डिसेंबरपासून करणार विदर्भव्यापी आंदोलन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने मांडणारे माजी आ. वामनराव चटप यांनी काल बुलडाण्यात त्यांचा निर्धार बोलून दाखविला. ३१ डिसेंबरपूर्वी करू वा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच २७ डिसेंबर २०२३ पासून विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा करून स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा केली.
     स्थानिक शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी पुढील आंदोलनावर विचारविनिमय करण्यात आला. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील आंदोलनाची माहिती दिली. अकोला जिल्ह्यात २० डिसेंबर २०२३ ला पश्चिम विदर्भ स्तरीय 'विदर्भ निर्माण संकल्प मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.