बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद बुलडाणा अंतर्गत महिला बचत गटांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विविध क्षमता बांधनी आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज महिला सक्षम होत असून बँकेच्या माध्यमातून तसेच अंतर्गत कर्जाच्या भरवश्यावर महिला स्वत:चा छोटा मोठा व्यवसाय त्यांचा सुरु आहे. परंतु महिला बचत गटांनी यावर समाधानी न राहता उद्योजक बनून अनेक महिलांना रोजगार द्यावा असे आवाहन सोनचीरेय्या शहर उपजीविका केंद्र च्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंचा स्टॉल प्रदर्शनी व विक्री केंन्द्राच्या उदघाटन प्रसंगी दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पोलीस स्टेशन समोर आयोजित केलेल्या प्रदर्शनी मध्ये व्यक्त केले.
पुढे बोलतांना मुख्याधिकारी म्हणाले की , गटातील महिलांनी बाजारपेठेचा विचार करून आपल्या गटातील वस्तूची गुणवत्ता चांगली ठेवून त्याचे पॅकेजिंग उत्कृट करा अश्या सूचना प्रदर्शनी मध्ये सहभागी झालेल्या महिला बचत गटांना दिल्या. तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या मार्फत भविष्यात अजून महिला बचत गटांसाठी आपण सर्व मिळून काम करू असे म्हणाले.जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सुद्धा गटाला भेटी देवून शासनाच्या PMFME योजने मधून गटाला उद्योजक होण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.या प्रदर्शनी व विक्री मध्ये महिलांनी तयार केलेले दिपावली चे विविध प्रकारचे फराळ ,आवळा पासून तयार केलेले पदार्थ, रेडीमेड गारमेंट ,साडी दुकान, चा व्यवसाय सुरु केला होता.यावेळी शहरातील अनेक महिला बचत गट, नागरिक यांनी प्रदर्शनी ला भेट देवून खरेदी सुद्धा केली. कार्यक्रमाच्या यशवस्वीतेसाठी दिगंबर साठे, वैशाली गायकवाड, नाजीया परवीन , महेंद्र सोभागे, सविता दाभाडे, प्रणाली तायडे ,पूनम पाटील, नलिनी लंकेश्वर , रुबिना परवीन यांनी विशेष सहकार्य केले.
